बंगळुरू, 13 मे : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी याला पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीच्या रिंगणात तो वडील एचडी कुमारस्वामी यांच्या पारंपरिक मतदारसंघात उतरला होता. एचडी कुमारस्वामी २००४ पासून सतत निवडणूक जिंकलेल्या या मतदारसंघात त्यांच्याच मुलाला पराभूत व्हावं लागलं. काँग्रेसचे उमेदवार हुसैन एच ए यांनी निखिल कुमारस्वामीचा पराभव केला.
रामनगर विधानसभा मतदार संघ हा जेडीएसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. निखिल कुमारस्वामी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनयात कारकिर्द गाजवलेल्या निखिल यांचा चेहरा ओळखीचा आहे. मात्र तरीही त्यांना पराभवाचा धक्का बसला. 2018 मध्ये या मतदारसंघात एचडी कुमारस्वामी विजय मिळवत चौथ्यांदा आमदार बनले होते. याच मतदारसंघात 1994 मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी विजय मिळवला होता.
‘तुम्ही पप्पू म्हटलं, पप्पू पास नही हो गया, मेरिट मे आया’
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात बाकी पक्षांना मागे टाकून काँग्रेस बहुमताच्या जवळ दिसत आहे. तसं, विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव होतो, तेव्हा ते हे निकाल लोकसभा निवडणुकीपासून वेगळे असल्याचं सांगू लागतात. पण इतिहासही एक गोष्ट सांगत असतो. गेल्या तीन निवडणुकांच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र असाही दावा केला जात आहे, की ही परिस्थिती यंदा बदलेल.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेससाठी बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी तयारी सुरू आहे. काँग्रेस सरकार स्थापन झालं आणि तेही पूर्ण बहुमत झाल्यावर सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने अहवाल घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.