साकोली : माझ्या क्षेत्रातील प्रत्येक गाव आदर्श आणि स्मार्टग्राम पूर्ण सुखसुविधायुक्त बनविणार त्यासाठी व माझ्या विधानसभा क्षेत्रासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी रेंगेपार कोहळी येथे (०१ एप्रिल) ७१ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन प्रसंगी बोलतांनी वक्तव्य केले. राज्य पुरस्काराचे मानकरी आदर्श गावं रेंगेपार कोहळी येथे ०१ एप्रिलला ग्रामपंचायत कमेटीतर्फे भव्य आरोग्य शिबीर व ७१ लक्ष रुपयांचे विकासकामांचे भुमिपुजन सोहळा संपन्न झाला. आपल्या भाषणात आमदार नाना पटोले म्हणाले की या संगणकीय युगात युवा विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धाकडे न वळता सांस्कृतिक, कला, तांत्रिक अभ्यासक्रमातून शैक्षणिक क्रांती घडवावी असा प्रेरणादायी संदेश त्यांनी याप्रसंगी दिला तसेच आज संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात आपण जा व साकोलीतून आलोय सांगाल तर तुमचा मानसन्मान होईलच व साकोली विधानसभेचे नाव आज महाराष्ट्र राज्यातील कानाकोप-यात नावलौकीक असून हाच साकोलीचा मला गर्व असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य शफीभाई लद्धानी, जि. प. सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, पं. स. सदस्य किशोर मडावी, सरपंच मनोहर बोरकर, उपसरपंच प्रा. भरत कावळे, विठ्ठल कावळे, सुषमा कापगते, उमेश मेश्राम, पांडूरंग सार्वे, पांडूरंग कापगते, श्रावण कापगते, विनायक मुंगमोडे, टोलीराम पोवनकर आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबीरामध्ये एकुण २१२ वृद्ध महिला पुरूषांनी शिबिराचा घेतला. भुमिपुजन सोहळ्यात रेंगेपार कोहळी, चिचटोला व परीसरातील सभागृह बांधकाम, मायनिंग रोड कालवा, तलाव खोलीकरण, सिमेंट रोड, शौचालये निर्माण, हॉर्वेस्टर प्रकल्प, पेव्हर ब्लॉक रस्ते असे विविध ७१ लक्ष रुपयांचे विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माझी वसुंधरा, कोरोना जनजागृतीवर पथनाट्य, रांगोळी स्पर्धा तर आयोजनात वृद्ध महिलांचा सत्कार, माजी सैनिक, आशा सेविका, ज्येष्ठ नागरीक, स्वच्छता अभियानात डस्टबिन वाटप, पारीतोषिक वाटप असे विविध कल्याणकारी योजनेतून प्रशस्तिपत्र व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्यकमेटी कृष्णा धारणे, सचिन नंदेश्वर, लेखाताई कापगते, विद्या भोयर, स्वाती मोहतुरे, चेतना नेवारे आणि रेंगेपार/कोहळी, चिचटोला, इंदिरानगर, राजीवनगर वासीयांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात संचालन प्रा. भरत कावळे तर आभार ग्रामसेवक एच. व्ही लंजे यांनी केले. यात ग्रामपंचायत रेंगेपार कोहळी कमेटी, आदर्श महिला ग्रामसंघ, नवजागृती महिला बचतगट, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, सहकार नाट्य रंगभुमी मंडळ, सखी महिला बचतगट, वैनगंगा महिला बचतगट, वनश्री पर्यावरण समिती, स्व. यादवराव कापगते स्मृति प्रतिष्ठान समिती, वनश्री गौरक्षण समिती रेंगेपार/कोहळी येथील सदस्य पदाधिकारी यांनी हा एकदिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले. शिबीरात आरोग्य सेवा डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. मनिषा निंबार्ते, डॉ. नितीन देशपांडे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेविका आणि जिल्हा परीषद प्राथ. शाळेच्या शिक्षकवृंदांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यासह सहकार्य केले. शांतता व सुव्यवस्थेकरीता लाखनी पोलीस ठाणे निरीक्षक श्री वाढीवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस चमु, होमगार्ड पथक यांचा चोख बंदोबस्त ठेवलेला होता.