भाग्यश्री प्रधान-आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 2 मे : भारतीय जेवण म्हटलं की मसाले आलेच. भारतात प्रत्येक प्रांतात विविध प्रकारच्या लाल मिरच्यांचा वापर करून त्या प्रांताच्या पद्धतीने मसाले केले जातात. हे मसाले करताना प्रामुख्याने काश्मिरी, बेडगी, संकेश्वरी, घाटी, खजुरी असे मिरचीचे प्रकार वापरले जातात. काही मिरचीचे प्रकार पदार्थाला चव देतात तर काही प्रकार पदार्थाला रंग देतात. मात्र, सध्या अवकाळी पावसामुळे मसाला करण्यासाठी लागणारी मिरची कल्याणच्या बाजारपेठेत महागली आहे. यामुळे किचनचं बजेट आणखी कोलमडणार आहे.
किती झाली वाढ?
तुमच्या शहरातून (मुंबई)
उन्हाळी हंगामात मिरची खरेदी करून गरम मसाला तयार करण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, यंदा मिरचीचे उच्चांकी भाव झाले आहेत. मिरचीच्या प्रत्येक प्रकारात किलोमागे जवळपास 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. मिरचीचे उत्पादन केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या प्रांतामध्ये पीक अधिक घेतले जाते. याच बरोबर या प्रांतात तमालपत्र, धणे, जिरे, लवंग या पदार्थांची आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मात्र, यावर्षी सर्वच राज्यात अवकाळी पाऊस झाला. काही राज्यांमध्ये तर चक्क पुर परिस्थिती निर्माण झाली होती. याचाच फटका मिरचीला बसल्याने मिरची महाग झाली आहे.
काश्मिरी, बेडगी, संकेश्वरी, घाटी, खजुरी असे मिरचीचे अनेक प्रकार आहेत. सध्या अवकाळी पावसामुळे मिरची महाग झाली आहे. यामध्ये संकेश्वरी मिरची 400 रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहे. मात्र चांगल्या दर्जाची संकेश्वरी मिरची 1200 रुपये किलो पर्यंत विकली जात आहे. विशेष म्हणजे देठ काढलेल्या मिरची देखील बाजारात उपलब्ध असून त्यांचा भाव किलोमागे 20 ते 30 रुपये अधिक आहेत अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
न बोलता मोठं काम करणारा मुंबईकर, सामान्यांमध्ये करतोय जागृती! Video
मसाला महागला
मिरचीच्या प्रत्येक किलोमागे जवळपास 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी वर्षभराचा मसाला 3 हजारात होत असे. आता मात्र वर्षभराचा मसाला करायला 10 ते 12 हजार रुपये लागत असल्याची माहिती गृहिणींनी दिली आहे.
मिरची भाव
संकेश्वरी – 400 ते 1200 रुपये किलो
रेशम पट्टी मिरची – 800 रुपये किलो
बेडगी मिरची – 400 ते 560 रुपये किलो
काश्मिरी मिरची – 600 ते 700 रुपये किलो
लवंगी मिरची – 300 ते 400
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.