दिल्ली, 08 मे : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतर मंतरवर दिग्गज पैलवान आंदोलन करत आहेत. यामध्ये बजरंग पुनिया हासुद्धा आहे. आता तो पुन्हा चर्चेत आला असून त्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची चर्चा सुरू आहे. यात त्याने बजरंग दलाला सपोर्ट केला होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये मी बजरंगी आहे, मी बजरंग दलाला सपोर्ट करतो, जय श्री राम असं म्हटलं होतं. तसंच ही पोस्ट सर्व बजरंगी भावांनी व्हॉटसअप डीपी आणि स्टेटसला लावण्याचं आवाहनही केलं होतं.
बजरंग पुनियाच्या या पोस्टवर टीका सुरू होताच ती डिलिट केली. २३ एप्रिलपासून देशातील दिग्गज पैलवान जंतर मंतरवर ठाण मांडून आहेत. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक पैलवानांचा समावेश आहे. काही महिला पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यात एका अल्पवयीन महिला पैलवानाचा समावेश आहे.
नो बॉलचे आहेत बरेच प्रकार, जाणून घ्या पंच कधी करतात इशारा
दोन महिला पैलवानांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांत तक्रार दिली होती की, बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यासोबत छेडछाड केली होती. आता अनेक संघटनासुद्धा पैलवानांच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. यात शेतकरी संघटनेचाही समावेश आहे. रविवारी भारतीय किसान युनियनचे नेत राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेत्यांनी बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.