धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 8 मे : ‘सर्व सृष्टीवर प्रेम करा’ असा संदेश भारतीय संस्कृतीमध्ये देण्यात आलाय. पण, त्याचवेळी अनेक ठिकाणाी प्राण्यांना क्रूर वागणूक मिळाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. हे प्रकार थांबावण्यासाठी मुंबईमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं.
काय होता कार्यक्रम?
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईच्या माटुंगा येथील प्रभा निकेतन इमारतीमध्ये पाळीव प्राणी प्रेमींसाठी फ्री अॅडोप्शन कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. ‘द हॅप्पी टेल्स’ या कार्यक्रमाचे आयोजक होते. कुत्रे आणि मांजरींना त्यांची काळजी घेतली जाईल अशा घरांमध्ये सोपवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
‘गेल्या 3 वर्षांपासून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतो. अनेक पाळीव प्राणी हरवतात, काही जण रस्त्यावर त्यांना सोडून देतात, अनेकांच्या घरात जागेअभावी त्यांना सांभाळणं शक्य होत नाही. कोरोना काळात सर्व जण घरी होते. वर्क फ्रॉम होम काम करताना विरंगुळा म्हणून अनेकांनी प्राण्यांना सांभाळण्यास सुरूवात केली. पण, आता ऑफिस सुरू झाल्यानं त्यांना त्यांचा सांभाळ करता येत नाही. या सर्व प्राण्यांना नवा निवारा म्हणून हा कार्यक्रम घेण्यात येतो. रस्त्यावरील भटके कुत्रे आणि मांजरींचाही यामध्ये समावेश असतो.
या कार्यक्रमात एकूण 40 कुत्री आणि मांजरींची नोंद झाली आहे. प्राणी प्रेमी त्यांना मोफत घरी घेऊन जाऊ शकतात. त्याचवेळी नव्या मालकांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्याचबरोबर त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जात आहे का? याची शहनिशा आमच्या टीमकडून पुढील काही महिने केली जाते,’ अशी माहिती द हॅप्पी टेल्सचे संस्थापक मंगेश शेखर यांनी दिली.
मुंबईजवळच आहे जावायांचं गाव, अनेक घरांनी जपलीय ही परंपरा, पाहा Video
पाळीव प्राण्यांना आपल्या घरी नेण्यासाठी मुंबईकरांनी या कार्यक्रमात चांगलीच गर्दी केली होती. या विषयावर जनजागृती होणं आवश्यक आहे. तसंच असे कार्यक्रम दर महिन्यात झाले पाहिजेत, अशी भावना मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.