धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 14 एप्रिल : आजकाल मुले वाचत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार ऐकू येते. मध्यमवर्गीय कुटुंबात मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी काही पालक जाणीवपूर्वक प्रयत्न करतातही; पण हे चित्र फार दुर्मिळ आहे. आजपर्यंत आपण फक्त सुविचार म्हणून ‘वाचाल तर वाचाल’ हे वाचत आलो आहे. मात्र, यासाठी वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी काम करणारे फार कमी आहेत. यामुळे बखर साहित्याची या उपक्राअंतर्गत मुंबईत राहणाऱ्या तीन मित्रांनी एक वेगळा प्रयोग केला आहे आणि सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.
कधी झाली सुरुवात?
तुमच्या शहरातून (मुंबई)
वैभव पाटील, राकेश म्हात्रे, अंकेश साटले हे तिघे बोरिवली दहिसर येथे राहणारे तीन मित्र आहेत. त्यांनी वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी बखर साहित्य या उपक्रमाची सुरुवात नोव्हेंबर 2022 मध्ये केली. बोरिवली दहिसरच्या लोकांना वाचनासाठी पुस्तके सहज मिळावीत म्हणून चक्क बुलेटचे रूपांतर पुस्तकांच्या स्टॉलमध्ये केले आहे. वाचन वेड्या मित्रांच्या बखर साहित्याची या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
फक्त मराठी पुस्तकं मिळतात
तिघे आपली नोकरी सांभाळून शनिवार – रविवारी सायंकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत बोरिवली पूर्वेच्या शांतीवन परिसरात बुलेटवर बुक स्टॉल लावतात. या बुक स्टॉलवर फक्त मराठी पुस्तकं मिळतात. यामध्ये साहित्य, ऐतिहासिक, काव्य संग्रह, कथा- कादंबरी, आध्यात्मिक, प्रेरणादायी, राजकीय, अशी अनेक पुस्तकं मात्र 10 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतची उपलब्ध होतात.
पुस्तके मिळवून द्यायचे ठरवले
लॉकडाऊन पासूनच वाचनाची जास्त आवड निर्माण झाली. त्यावेळी आम्ही आमच्याकडील पुस्तके एकमेकांना देवाण घेवाण करून वाचत होतो. तसेच पाहिले तर उपनगरात पुस्तकांची दुकान नाहीत. बोरिवली दहिसर कडील वाचन प्रेमींना पुस्तके घेण्यासाठी दादर भागात जावे लागते. त्यातही मोठ्या लेखकांची बेस्ट सेलर पुस्तके सहज मिळतात. मात्र अन्य पुस्तके सहसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या भागातील वाचन प्रेमींना सर्व प्रकारची पुस्तके मिळवून द्यायचे आम्ही ठरवले. बखर साहित्याची या उपक्रमाची सुरुवात नोव्हेंबर 2022 पासून झाली, अशी माहिती राकेश म्हात्रे यांनी दिली आहे.
बोरिवली पूर्वेला शांतीवन सोना टॉकीजच्या समोर वैभव पाटील या मित्राची बुलेट उभी असते. त्याच बुलेटवर तिघांनी मिळून पुस्तकांचा स्टॉल उभा केला आहे. लोक येतात पुस्तकात चाळतात आणि विकत घेतात. मुंबईत राहिला असल्यामुळे मुंबईत दुकानांचा भाडं हे परवडणार नाही. यासाठी जुगाडू डोकं लावून आम्ही बुलेटचा वापर स्टॉलमध्ये केला आहे, असंही राकेश म्हात्रे याने सांगितले आहे.
पुणेकरांना येणार नाही ट्रॅफिक जामचा कंटाळा, रिक्षाचालकानं शोधली भन्नाट आयडिया, पाहा Video
कसं ठेवलं नाव?
बखर साहित्याची ही संकल्पना आम्ही तीन मित्रांनी सुरू केली आहे. आणि यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पुस्तक चाळता येणार आहेत. त्याच प्रकारे स्टॉलवर उपलब्ध नसलेली पुस्तक एखाद्या व्यक्तीला हवी असतील तर संपर्क साधून घरपोच देखील पुस्तक मागवता येतील. तसेच नाव काय ठेवायचं यावर चर्चा करत असताना आम्ही प्रत्येक प्रकारची मराठी पुस्तक एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत असल्याने त्या ठिकाणाला बखर असं म्हटलं जातं म्हणून सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध असल्यामुळे बखर साहित्य, असं नाव ठेवण्यात आलं असं वैभव पाटील याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.