धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 22 एप्रिल : गेल्याकाही दिवसात राज्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई आणि उपनगरातही मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. घामाचा धारा आणि अंगाची काहीली होत असल्याने मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. या वाढणाऱ्या उष्णतेमध्ये मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात असणाऱ्या पेंग्विनची काळजी कशी घेतली जाते. याबद्दल या उद्यानात प्राण्यांच्या डॉ. म्हणून काम करणाऱ्या मधुमिता काळे यांनी माहिती दिली आहे.
किती आहेत पेंग्विन?
तुमच्या शहरातून (मुंबई)
राणीची बाग म्हणून मुंबईकरांमध्ये प्रचलित असलेल्या या बागेत सध्या 7 नर आणि 5 मादी असे एकूण 12 पेंग्विन आहेत. हे सर्व पेंग्विन हम्बोल्ट जातीचे आहेत. त्यांच्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी गुहा, बीळ आणि बसण्यासाठी मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. मुंबईतील हवामानाचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून या पेंग्विनची काळजी घेण्यात येत आहे.
कशी घेतली जाते काळजी?
उन्हाळ्यामध्ये पेंग्विनची काळजी घेण्यासाठी हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये ज्या ठराविक तापमानावर कक्ष नियंत्रित केलेला असतो. तसाच कक्ष उन्हाळ्यामध्ये नियंत्रित ठेवला जातो. 15 – 16 डिग्री तापमान आतमध्ये असते तर 55 – 60 टक्के ह्युमिडिटी असते. त्यामुळे उन्हाळ्यात वेगळी काळजी घेण्याची गरज भासत नाही, असं असं मधुमिता काळे सांगतात.
पर्यटकांना भन्नाट अनुभव
सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे पेंग्विन हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे राणीच्या बागेतील पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. शनिवार रविवारच्या दिवशी ही संख्या अधिक असते. तसेच पेंग्विनची संख्या देखील वाढल्यामुळे पर्यटकांना बघताना आणखी चांगला अनुभव मिळत आहे. जानेवारी फेब्रुवारी पासून पेंग्विनचा ब्रीडिंग सीजन सुरू होतो. या काळात अंडी आणि पिल्लं अशी असतातच असंही डॉ. मधुमिता काळे यांनी सांगितलं.
इंदुरी पोहे आणि चाटचा घ्या मुंबईत आस्वाद, एकदा खाल तर पुन्हा याल! Photos
गूगल मॅपवरून साभार
कुठे आहे उद्यान?
वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान लालबाग फ्लायओव्हर, भायखळा जवळ, भायखळा पूर्व, भायखळा, मुंबई, महाराष्ट्र 400027
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.