मोहन जाधव, प्रतिनिधी
मुंबई, 01 एप्रिल : मुंबईच्या समुद्रामध्ये पुन्हा एकदा एक बोट सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीवर एक पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मेल अंतरावर ही बोट सापडली आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची एक बोट समुद्रात पोहोचली आहे. पण, यावर कारवाई ही नौदलाकडून होणार आहे.ही हद्द नौदल आणि तटरक्षक दलाच्या अंतर्गत येते, त्यामुळे पुढील कारवाई त्यानुसार होणार आहे. या बोटीवर ही लोक कोण आहे आणि कुठून आली आहे, याबद्दल चौकशी सुरू आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
(सविस्तर बातमी लवकरच)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.