मुंबई, 15 एप्रिल : मुंबईत दिवसाढवळ्या दुकानदारावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहरातील पायधुनी परिसरात दोन तरुणांनी दुकानदारावर तलवारीने हल्ला केला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि दोन्ही तरुणांमध्ये खरेदीवरून वाद झाला, त्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले.
Maharashtra | Attack on a shop owner in broad daylight in Mumbai’s Paydhuni on 14th April
Two accused – Amir Raees Ahmed Khan and Vinayak Raju Patel- have been arrested from Mahim and booked under various sections of IPC and Arms Act. Although the motive behind the attack is… pic.twitter.com/z7U5Ik9aBW
— ANI (@ANI) April 15, 2023
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडीओ
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईतील घटना, दुकान मालकावर तलवारीने हल्ला pic.twitter.com/8k3gvAatKb
— sachin (@RamDhumalepatil) April 15, 2023
अमीर रईस अहमद खान आणि विनायक राजू पटेल अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना माहीम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हल्ला का केला? याचा तपास पोलीस करत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.