मुंबई, 08 एप्रिल : मुंबईत ३ अतिरेकी आल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आले असल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईत दुबईवरून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आले असल्याचा आणि त्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा कॉल करणाऱ्याने दावा केलाय. त्यातील एकाचं नाव मुजीब सय्यद असं आहे. त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना देण्यात आलं आहे.
मी माणूस आहे…; नॉट रिचेबलच्या चर्चांवर अजित पवार स्पष्टच बोलले
तुमच्या शहरातून (मुंबई)
पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने अशीही माहिती दिली की, अतिरेक्यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याचा दावा त्याने केला. फोन करणाऱ्या व्यक्तीचे नावही समोर आलं आहे. राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात फोन केला. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.