मुंबई, 12 एप्रिल : मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. त्यांची बैठक पूर्ण होत नाही तेच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा तिथे पोहोचले.
आज दुपारी विरोधी पक्षनेते अजित पवार हे ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
अवकाळी पाऊस आणि गारपिटीवर मदतीबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. अजित पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिले होते. त्यानंतर आज अजितदादा भेटीला आले होते. जवळपास अर्धा तास ही बैठक पार पडली.
(अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार, कुटुंबावर अन्याय झाल्याने तरुणाचा इशारा)
दरम्यान, ही बैठक सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले होते. राणेंची एंट्री झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपवून बाहेर निघाले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असून ते भाजपमध्ये सामील होणार अशी बातमी व्हायरल झाली आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
‘अंजली दमानिया यांनी अजित पवार हे 15 आमदारांसह भाजपला पाठिंबा देतील, असं ट्वीट केलं होतं. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार’ असं म्हणताच एकच हश्शा पिकली.
(पुण्यात माझ्यामुळे जीवाला धोका असलेल्याला संरक्षण द्या – अजित पवार )
पुण्यात भाजप उमेदवारांनी तक्रार केली आहे. मुळात कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुणाचाही जीवाला धोका असेल तर संरक्षण द्यावे, पोलिसांनी संरक्षण द्यावे माझ्यामुळे धोका होईल असं वाटत का? मी कायदा पळणारा नेता आहे. राजकीय धोका असू शकतो शारीरिक धोका असू शकत नाही, असंही अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.