बंगळुरू, 21 मे : आयपीएल 2023 मधील शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला आहे. यामुळे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले असून मुंबई इंडियन्सची आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये दणक्यात एंट्री झाली आहे.
आयपीएल 2023 च्या 70 वा सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगला होता. यासामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घालवून 197 धावा केल्या. यामध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमधील त्याचे 7 शतक ठोकले.
आरसीबीकडून विजयासाठी 198 धावांचे आव्हान मिळाले असताना गुजरातच्या फलंदाजांनी मैदानावर जबरदस्त फलंदाजी केली. गुजरात टायटन्सकडून युवा स्टार खेळाडू शुभमनने आयपीएलमधील त्याचे दुसरे शतक ठोकले. गुजरातने आरसीबीने दिलेले आव्हान 6 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पूर्ण केले. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे आरसीबीने आयपीएल 2023 मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
आरसीबीने गुजरात विरुद्धचा सामना जिंकला असता तर ते आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये जाणारी चौथी टीम ठरले असते. परंतु आता आरसीबीचा पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्स , चेन्नई सुपरकिंग्स, लखनौ सुपर जाएंट्स यासंघांनी प्लेऑफमध्ये आपल स्थान पक्क केल आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 9 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.