मुंबई, इंडियन्स, 09 एप्रिल : यंदाच्या आय़पीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप दमदार कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही. त्यातच प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. जसप्रीत बुमराह आयपीएलला मुकल्यानंतर जोफ्रा आर्चरवर वेगवान गोलंदाजीची मदार होती. मात्र दहा पैकी पाचच सामन्यात तो खेळू शकला. आता उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नसल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली आहे. त्याच्या जागी ख्रिस जॉर्डनचा मुंबईच्या ताफ्यात समावेश करण्यात आलाय.
ख्रिस जॉर्डनने 2016 च्या आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्याला एकूण 28 सामन्यात संधी मिळाली असून यात त्याने 27 विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाज असलेल्या ख्रिस जॉर्डनने 87 टी20 सामने इंग्लंडकडून खेळले आहेत. यात जॉर्डनच्या नावावर 96 विकेट आहेत. डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट अशी जॉर्डनची ओळख आहे.
मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू हिटमॅनच्या Poor Form वर बोलला, ‘रोहित म्हणजे….’
मुंबई इंडियन्सने जॉर्डनला 2 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. आधीपासूनच जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या संघासोबत होता. पण अधिकृतपणे त्याची घोषणा करण्यात आली नव्हती. आता मुंबई इंडियन्सने अधिकृत माहिती दिली आहे. मुंभई इंडियन्सने म्हटलं की, जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश करण्यात आला आहे. आर्चर रिकव्हरी आणि फिटनेसमुळे पुढील सामन्यांत खेळणार नाही. तो मायदेशी परतणार आहे.
पाच वेळा आय़पीएलचं विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात 10 पैकी पाच सामनेच जिंकता आले आहेत. पॉइंट टेबलमध्ये मुंबईचा संघ आठव्या स्थानी आहे. जर मुंबई इंडियन्सला आरसीबीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाला तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. सध्या फक्त दोनच संघांचे 12 किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.