शहापूर, 12 मे : शहापूर शेनवे येथील 5 जण घोटी येथील हॉस्पिटल मधून कारने रात्रीच्या वेळी शहापूर येथे येत असताना भीषण अपघात झाला. शेरपोली घाटात स्पीड ब्रेकरवर एका पीकअप गाडीने ब्रेक घेतला तिच्या पाठीमागे असलेली कार पीकअप गाडीवर जोरदार जाऊन आदळली. त्यानंतर कारच्या मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष होते ते गाडीतच चिरडले गेले.
अपघातानंतर पाचही जण गाडीमध्ये अडकून पडले होते. 2 पुरुष व एका महिलेला स्थानिकांनी बाहेर काढले, मात्र वाहन चालक आणि एका महिलेला गाडीतून काढताना खुप शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यामध्ये महिला आणि कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरू आहे.
लेकीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडू? शेतकऱ्याने व्हिडीओ रेकॉर्ड करून संपवलं आयुष्य
तुमच्या शहरातून (ठाणे)
एका महिन्या पूर्वी चेरपोली घाटात दीड किलोमीटरच्या अंतरावर 4 स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. परंतु हे स्पीड ब्रेकर जीव घेणे ठरत आहेत. त्यामुळे रोज अपघात घडतात. तसेच तिथे कोणत्याही प्रकारचे फलक देखील लावण्यात आले नाहीत. उतार असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने येत असतात व समोर स्पीड ब्रेकर दिसल्याने वाहन चालकाला अर्जेट ब्रेक घ्यावा लागतो. त्यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाचा ब्रेक न लागल्याने समोरील वाहनावर जाऊन जोरदार आदलते त्यामुळे अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. रोज रात्री व दिवसा सतत अपघात घडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.