मुंबई, 19 मे : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासून उमेदवार चाचपणी सुरु झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा तिकिट वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यंदा निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट देण्यात येणार आहे, त्यासाठी भाजपने पालिका प्रभागनिहाय जागांचा सर्व्हे केला आहे.
आतापर्यंत 4 जागांचा सर्व्हे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर यावेळी भाजप कमकुवत उमेदवारांना डच्चू देणार आहे, तर विरोधीपक्षातील सक्षम उमेदवारांवरही भाजपचा डोळा असणार आहे. उमेदवारांच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी भाजपकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
पालिका निवडणुकीसाठी भाजप गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे भाजप पालिकेसाठी कोणाला तिकीट देते आणि कोणाचे तिकिट कापणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, शिरसाट, सरनाईकांना लागणार लॉटरी?
ऑगस्टनंतरच निवडणूक?
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऑगस्टनंतरच होण्याची शक्यता आहे, कारण प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेतील प्रभाग 227 वरून 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. तो निर्णय बदलत शिंदे फडणवीस सरकारनं प्रभागांची संख्या 236 वरून 227 करण्याचा निर्णय घेतला, शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या पक्षाकडून सुप्रीम विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार, नगरविकास मंत्रालय आणि राज्य निवडणूक आयोग यांना
नोटीस बजावत आपले म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
‘शासन आपल्या दारी’ योजनांची भाजप आमदारांकडूनच पोलखोल; महिलांकडून पैसे घेतल्याचं केलं उघड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.