तुषार रुपणवार, प्रतिनिधी
मुंबई, 9 मे : देशातील सर्वात महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. गेल्या 25 वर्षांपासून ठाकरे गटाची एकहाती सत्ता महापालिकेवर होती. मात्र, आता शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याने इतर पक्षांच्या महत्वकांशा वाढल्या आहेत. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. नुसती कंबर कसली नाहीतर भाजपने रणनीती देखील आखली. नेमकी काय आहे रणनीती? याच विषयीचा स्पेशल रिपोर्ट.
गेली अनेक वर्षे या मुंबई महानगर पालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. हीच सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मिशन 150 ची योजना आखली आहे. मिशनच्या अंमलबजावणीसाठी पक्षाच्या वतीने फिल्डिंग लावण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्यानं भाजपनं विजयासाठी कंबर कसली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
वाचा – इम्रान खानना खेचत घेऊन गेले पाकिस्तानी रेंजर्स, अटकेचा पहिला Video
पक्षाच्या नियोजनानुसार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. बुथ स्तरावरील अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात येणार आहे. गरज भासल्यास वॉर्ड व जिल्हा अध्यक्षही बदलण्यात येणार आहेत. राज्याच्या प्रदेश कार्यकारिणी प्रमाणेच मुंबई कार्यकारिणीत देखील महिनाभरात मोठे बदल अपेक्षित आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्या वतीनं सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत आपला झेंडा फडकवण्यासाठी आता भाजप सज्ज झालं आहे.
मविआ लोकसभा एकत्र लढणार?
मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार की वेगवगळे हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र लढणार असल्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी तसे संकेत देखील दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे देखील महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे भाजपसोबत राज्यात सत्तेत असलेला शिंदे गटाची काय करणार? भाजप आणि शिंदे गटात जागावाटप कसं होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.