प्रमोद पाटील, प्रतिनिधी
नवी मुंबई, 28 मार्च : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि शिंदे कुटुंबीयांसाठी खास क्षण होता. नवी मुंबईतील D.Y पाटील विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द मानद डिलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आता डॉ.एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जाणार आहे.
D.Y पाटील विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द मानद डिलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. सदर कार्यक्रम नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानात पार पडला. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे भारावून गेले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
आज मला पदवी मिळाली माझे वडील पण आहेत. सर्व कुटुंब आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि अधिकारी आहेत. कौटुंबिक जबाबदारी मुले मी शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे खंत होती. पण तीन वर्षापूर्वी मी बी ए डिग्री घेतली. आणखी काही करायचे आहे. मात्र मधला माझा वेळ एक ऑपरेशन करण्यात गेला’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.
(शरद पवार पुन्हा ठरले महाविकासआघाडीचे संकटमोचक! विरोधकांच्या बैठकीतली Inside Story)
‘दर्डाजी आपण म्हणालात की तुम्ही डॉक्टर एकनाथ शिंदे झालात,ऑल रेडी मी डॉक्टर झालोय. छोटी मोठी ऑपरेशन करतो’ अशी मिश्किल टिप्पणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डी वाय पाटील विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात नवी मुंबईतील कार्यक्रमात केली.
तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोटामुळे खळबळ
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी आज ‘2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली.
(भर सभेत अजित पवार चुकले, पॉझ घेतला अन् खळखळून हसले, Video)
‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो जनतेने कल ही आमच्या बाजूने दिला मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असल्याचा डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सांगितलं होतं. पण सावंत यांनी सत्ताबदलात फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्याने यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.