मुंबई, 20 एप्रिल- दमदार कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि सादरीकरणामुळे काही हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहतात. मुन्नाभाई एमबीबीएस हा त्यापैकीच एक चित्रपट होय. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले.
अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी या चित्रपटात साकारलेली मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी आजही प्रेक्षकांना भावते. खरं तर या जोडीने पडद्यावर केलेली धमाल प्रेक्षक कदापि विसरणार नाहीत. या चित्रपटात स्वामी नावाचं एक पात्र होतं. लहान असूनही हे पात्र प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. ही भूमिका खुर्शीद लॉयर नावाच्या अभिनेत्याने साकारली होती. या चित्रपटात सडपातळ दिसलेल्या खुर्शीदचा लूक आता पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. विरल भयानीने काही महिन्यांपूर्वी खुर्शीद लॉयरचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्याला ओळखलंच नाही. त्याच्या लूकमध्ये झालेल्या बदलाविषयी जाणून घेऊया.
2003 मध्ये अभिनेता संजय दत्त याचा कॉमेडी ड्रामा असलेला मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट एव्हरग्रीन असून,तो प्रेक्षकांना आजही पाहायला आवडतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. या चित्रपटात डॉक्टर स्वामी नावाचे पात्र खुर्शीद लॉयरने साकारलं होतं.
कायद्याच्या कचाट्यात अडकला हनी सिंग; रॅपरवर किडनॅपिंग-मारहाणीचे गंभीर आरोप
मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये अशक्त, घाबरट असलेल्या स्वामी नावाच्या विद्यार्थ्याची भूमिका साकारणाऱ्या खुर्शीदचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. विरल भयानीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर काही महिन्यांपूर्वी खुर्शीदचे फोटो शेअर करण्यात आले होते. हे फोटो पाहिल्यावर अनेक जण त्याला ओळखू शकले नाहीत. `द ग्रेट इंडियन मर्डरर` या वेबसिरीजच्या माध्यमातून खुर्शीदने पुन्हा अभिनयक्षेत्रात पदार्पण केले तेव्हा हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. या फोटोत खुर्शीदने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे दिसून आलं होतं. तसेच त्याची दाढी देखील वाढलेली होती. त्याचं वाढलेलं वय या फोटोतून स्पष्टपणे दिसत होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.