रीवा : मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सासरा शेतात उघडपणे आपल्या सुनेला चप्पलने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडीओ मारहाण होत असलेल्या महिलेच्या मुलीने केला आहे. हा व्हिडीओ करताना ती चिमुकली ओरडताना दिसत आहे.
बराच वेळ मारहाण केल्यानंतर सासऱ्याने सुनेला तशाच अवस्थेत शेतात सोडले. यानंतर त्या महिलेने पोलीस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितले की पती तिच्यासोबत राहत नाही, तो मुंबईत रिक्षा चालक आहे. ही घटना मध्यप्रदेशमधील चांदई गावातील आहे. याबाबत तक्रार घेत पोलिसांनी सासरच्या विरोधात कलम 294, 223, 354, 506-बी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रीवा जिल्ह्यात इतका व्हायरल झाला की एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती महिलेला मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा वृद्ध सासरा असून तो सुनेला मारत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद इतका वाढला की त्या व्यक्तीने महिलेला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. सरीकडे महिलेचा आवाज ऐकून तिची मुलगी घरातून बाहेर आली तेव्हा तिला धक्काच बसला. तीने मोबाईल काढला आणि मारहाणीचा व्हिडीओ करायला सुरु केली. तिने आरडाओरडा करून आजोबांना आईला सोडण्याची विनवणी केली, परंतु सासऱ्यांवर काहीही परिणाम झाला नाही.
रीवाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल सोनकर यांनी सांगितले की, वीजबिलावरून सासरे आणि सून यांच्यात वाद झाला. दोघांचे घर एकच आहे, पण ते वेगळे राहतात. सून आणि सासरे शेषमणी स्वतंत्र खोलीत राहतात. सासरच्या मंडळींवर मारहाण आणि विनयभंगाचा आरोप आहे. तर सुनेवर कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे.