लिस्बॉन, 20 एप्रिल : आपल्या जवळची आपली प्रिय व्यक्ती आपल्याला कायमची सोडून या जगातून गेली, की त्याचं दुःख प्रत्येकाला होतं. काही लोक तर त्यानंतर इतके विचित्र वागू लागतात ज्याचा आपण विचारही करणार नाही. असंच एक धक्कादायक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. ज्यात एका महिलेच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण त्यानंतर तिने मृत वडिलांना आपल्या घरातच ठेवलं. 15 वर्षे ती मृत वडिलांच्या मृतदेहासोबत राहिली. त्यानंतर शेवटी जे पोलिसांनी पाहिलं ते हादरवणारं होतं.
पोर्तुगालमधील ही घटना आहे.2001 साली एक व्यक्ती आपल्या मुलीसोबत एका इमारतीत राहायला आली. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. बापलेक दोघंच त्या घरात राहत होते. शेजाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी त्या व्यक्ती 15 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. त्यानंतर ती पुन्हा कधीच दिसली नाही. त्यांची मुलगी घरात राहत होती पण इतक्या वर्षांत ती कुणाशी फारशी बोलली नाही. ती स्वतःमध्येच मग्न असायची, तिला कुणाची पर्वा नव्हती.
एक दिवस शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी आली म्हणून त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला. आता पाहलं तर एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह होता. 55 ते 65 वयोगटातील महिला आणि 80 वर्षांचा पुरुष. महिलेचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला होता. तर पुरुषाच्या मृततदेहाचा सांगाडा झाला होता. दोघांचाही मृत्यू नैसर्गिक झाला.
OMG! वेदना होऊन सूजलं हाताचं बोटं, पाहिलं तेव्हा त्यात सापाचं…; व्यक्तीही शॉक
मिररच्या रिपोर्टनुसार या मुलीने वडिलांच्या मृतदेहासोबत 15 वर्षे एकाच घरात घालवली आणि शेवटी तिचाही मृत्यू झाला. आश्चर्य म्हणजे घरात इतके वर्ष मृतदेह होता तरी शेजाऱ्यांना त्यांच्या घऱातून कधीच दुर्गंधी आली नाही, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.