वॉशिंग्टन, 17 एप्रिल : अमेरिकेत दोन दिवसात किमान सहा शिक्षिकांना त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला शिक्षिकांपैकी एकीने १६ वर्षांच्या दोन मुलांचा तीन वेळा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसात सहा महिला शिक्षिकांना अटक करण्यात आल्यानंतर अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
सहा शिक्षिकांना त्यांच्या शाळांमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यात ३८ वर्षांच्या एलेन शेल नावाच्या महिला शिक्षिकेवर थर्ड डिग्री रेपचा आरोप आहे.
सलग 19 दिवस जागा राहिला व्यक्ती, नावावर विश्वविक्रम झाला पण शेवटी भयंकर घडलं
एका तक्रारीनुसार, शेलवर दोन १६ वर्षीय मुलांसोबत तीन वेळा लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तिला गेरार्ड काउंटी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. डब्लूटीकेआरच्या माहितीनुसार शेलने वुडलॉन एलिमेंट्री स्कूलमध्ये एका शिक्षकासोबत सहायक म्हणून काम केलं. त्याआधी ती लँकेस्टन एलिमेंट्री स्कूलमध्ये काम करत होती.
बॉयल काउंटी स्कूलच्या अधिकाऱ्यांनी शेलच्या आई-वडिलांना एक पत्र पाठवून इशाराही दिला होता. यावेळी शेलला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तर अरकंसासची शिक्षिका हिथर हरे हिनेही शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तर ओल्काहोमातील २६ वर्षीय एमिली हैनकॉकला गुरुवारी अशाच आरोपााखाली अटक करण्यात आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.