मुंबई : मे महिन्यात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. दिल्लीसह देशातील अनेक भागात तापमान वाढू लागले आहे. बंगालपासून बिहारपर्यंत अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. दुसरीकडे, मोका चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. जाणून घेऊया, देशभरातील हवामानाची स्थिती.
12 मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ दुपारपर्यंत रौद्र रुप धारण करेल. यानंतर ते उत्तर-पूर्व दिशेला वळत पुढे जाऊ शकते. ते पूर्व बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे.
मोका वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात धडकणार आहे. 14 तारखेच्या सकाळी कॉक्स बाजार आणि क्यूप्यू दरम्यान कुठेतरी धडकणे अपेक्षित आहे. या राज्यांमध्ये समुद्राची स्थिती बिकट होईल.
Weather Update : काळजी घ्या! उन्हाच्या झळा वाढणार, राज्यात आज ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट
ओडिशा आणि पश्चिम बंगालची भारतीय किनारपट्टी वादळापासून सुरक्षित अंतरावर असेल आणि जमिनीवर कोणतीही हानीकारक हवामान क्रियाकलाप अपेक्षित नाही. या राज्यांच्या किनारपट्टीवर समुद्राची स्थिती अत्यंत खडबडीत असेल. जमिनीवर आदळल्यानंतर कमकुवत झालेल्या वादळामुळे 14 आणि 15 मे 2023 रोजी त्रिपुरा आणि मिझोराममध्ये अतिवृष्टी होऊ शकते.
महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 42 ते 45 अंश सेल्सियसवर तर पुण्यात 40 आणि मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सियसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात आज उष्ण कोरडं हवामान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कमाल तापमानात वाढ होईल असंही म्हटलंय. दमट आणि उष्ण हवामानामुळे त्रास होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.