कोलकाता, 08 मे : गेल्या आठवड्याभरात बंगालच्या खाडीत मोचा चक्रीवादळ तयार होत आहे. या चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय. दरम्यान, याचा फटका आय़पीएलमधील सामन्यांनाही बसू शकतो. केकेआर विरुद्ध राजस्थान यांच्या सामन्यावर पावसाचे पाणी फिरू शकते.
कोलकाता नाइट रायडर्सला आतापर्यंत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दहापैकी चारच सामने त्यांना जिंकता आले आहेत. ते पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहेत. प्लेऑफ गाठायची असेल तर उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील.
‘मी बजरंगी…’, पुनियाने केलं बजरंग दलाचं समर्थन; ट्रोल होताच पोस्ट केली डिलीट
कोलकाता नाइट रायडर्सला चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 11 तारखेला कोलकात्यात पावसाची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळाचा फटका यादिवशी बसू शकतो. याच दिवशी केकेआर आणि राजस्थान यांचा इडन गार्डन्सवर सामना होणार आहे. जर पावसामुळे हा सामना झाला नाही तर दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात येईल. यामुळे केकेआरला इतर सामने जिंकले तरी प्लेऑफ गाठणं कठीण होईल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार झालं आहे. यामुळे 8 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यानंतर हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू चक्रीवादळात रुपांतरीत होऊन उत्तरेकडे सरकेल.
Mocha Cyclone impact : उकाड्यापासून सुटका पण पिकांचं नुकसान, पुढचे 4 दिवस पावसाचं धुमशान
कोलकात्यात 10 मे पूर्वी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे 8 मे रोजी होणाऱ्या केकेआर विरुद्ध पंजाब यांच्या सामन्यावेळी पावसाची शक्यता नाही. मात्र 11 मे रोजीच्या सामन्यावेळी चक्रीवादळाचा परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.