मुंबई, 23 मे : मोठी बातमी समोर येत आहे. ईडीच्या चौकशीनंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी दहा वाजता जयंत पाटील हे सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर प्रथमच या दोन नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे.
तब्बल साडेनऊ तास चौकशी
ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली होती. ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार सोमवारी जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहिले. ईडीकडून तब्बल साडेनऊ तास जयंत पाटील यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी कधीही संबंध आला नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चांगली वागणूक दिली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला बराच वेळ बसावं लागलं, याबद्दल तुमचे आभार. भविष्यातही मला तुमचं असंच सहकार्य मिळेल, असं जयंत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले. ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर जयंत पाटील सोमवारी सकाळी ईडी ऑफिसमध्ये दाखल झाले, यानंतर त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. जयंत पाटील यांची चौकशी सुरू होती, तेव्हा कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनही केलं. तसेच सोमवारी राज्यभरात कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.