अमृतसर, 17 एप्रिल : मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील जंडियाला विधानसभा क्षेत्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बलविंदर सिंह गिल असं या भाजप नेत्याचं नाव आहे. या हल्ल्यामध्ये बलविंदर सिंह हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. बलविंदर सिंह हे अमृतसर जिल्ह्यातील जंडियाला विधानसभा क्षेत्रातील रहिवासी आहेत. सध्या त्यांच्यावर अमृतसरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अज्ञाताकडून गोळीबार
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे बलविंदर सिंह यांच्यावर जंडियाला विधानसभा क्षेत्रात अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अमृतसरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यांच्यावर गोळीबार का करण्यात आला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
बलविंदर सिंह यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.