मुंबई, 20 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी देखील असणार आहेत. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, मात्र अद्यापही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
गारपीटीमुळे नुकसान
तुमच्या शहरातून (मुंबई)
शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका सुरूच आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला. बाजरी, कापूस यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं. खरीप हंगाम गेला निदान रब्बी हंगामात तरी उत्पादन होईल या अशेन बळीराजा पुन्हा उभा राहिला. मात्र रब्बी हंगामात देखील अवकाळीचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे गहू, ज्वारी, हरभारा, यासारख्या पिकांंचं तसेच केळी, आंबा आणि द्राक्ष बागाचं मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
युतीची चर्चा
दरम्यान यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.