मुंबई, 17 मे : महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक बैठक देखील पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह महाविकास आघाडीमधील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून 48 जागांपैकी 20 जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जागा वाटपावर प्रतिक्रिया
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील. दादरा नगर हवेलीमधून देखील आमचा एक खासदार विजयी होईल. लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर सुरुवातील 20 जागांवर दावा करणारा शिवसेना ठाकरे गट दोन पऊलं मागं आला आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
सुषमा अंधारेंशी पंगा महागात; बीडमध्ये झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय
शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकांवरून शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आता मुंबई महापालिका निवडणूक घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल कोणाचा पोपट मेला आहे. शिंदे सरकारचा पोपट ऑक्सिजनवर असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच बीड प्रकरणावर बोलताना त्यांना सांगितलं की जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षात असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.