मुंबई, 24 मे : रस्त्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कंपनीच्या गाड्या दिसतात. त्यामध्ये दुचाकी, चार चाकी, सहा आणि आठ, तर अगदी बारा चाकी ट्रक आहेत. माल वाहून नेण्यासाठी ट्रकचा वापर केला जातो माल जड असो वा हलका, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रक ही नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. जरी बाजारात ट्रकचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये चार चाकी ट्रकपासून ते मोठ्या 18 चाकांची ट्रॉली ट्रक देखील येतात.
पण तुम्ही कधी या ट्रकच्या टायरना नीट पाहिलंय? यामध्ये असे काही टायर असतात, जे रस्त्यावर पूर्णपणे न चालता हवेत लटकतात. पण असं का असतं? किंवा या टायरचा वापर काय? कधी विचार केलाय?
कितीही उंचावरुन मांजर पडली तरी तिला काहीच कसं होत नाही? यामागे लपलीय एक अजब ट्रीक
वास्तविक, ज्या ट्रकमध्ये जास्त वजन आहे त्या ट्रकमध्ये हे टायर बसवले जातात. याशिवाय, ज्या ट्रकमध्ये जास्त प्रमाणात टायर बसवली आहेत, त्या टायरमध्ये काही टायर असे असतात, जे खाली जमिनीला स्पर्श करत नाहीत, म्हणजेच ज्यावर ट्रकचे वजन नसते. हे टायर जमिनीच्या वर आहेत आणि लटकलेली दिसतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे टायर अगदी विशिष्ट कारणांमुळे हवेत लटकलेली असतात. वेळ आल्यावर त्यांचा वापर केला जातो. प्रत्येक टायरला वजन उचलण्याची स्वतःची मर्यादा असते, असे सांगण्यात आले. जड भार वाहून नेण्यासाठी ट्रक तयार केला जातो, तेव्हा त्याला अतिरिक्त एक्सलची आवश्यकता असते.
यामुळेच ट्रकची वहन क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रत्येक टायरचे वजन कमी करण्यासाठी सुटे टायर बसवले जातात. अधिक टायर असलेल्या ट्रकमध्ये, हवेत असलेल्या टायरना ड्रॉप अॅक्सल म्हणतात.
म्हणजे जेव्हा ट्रकमध्ये जास्त भार नसेल तेव्हा हा टायर खराब होऊ नये म्हणून तो वर उचलला जातो आणि मग तो स्पेअर टायर म्हणून काम करतो. तसेच ज्यावेळेला ट्रक पूर्णपणे भरलेला असतो आणि वजन जास्त असते तेव्हा ते ट्रकच्या पुढील एक्सलवरील वजन कमी करण्यासाठी खाली टाकले किंवा काढले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.