मुंबई : कन्वर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म बॉबल एआय (Bobble AI) याने स्मार्टफोन वापरणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांवर एक रिसर्च केला आहे. त्यातून महिला आणि पुरुष सर्वात जास्त काय मोबाईलवर सर्च करतात किंवा काय बघतात याची माहिती समोर आली आहे. . या रिसर्चमध्ये साधारण 8.5 कोटी आणि महिलांनी अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत आहेत . अहवालानुसार, बहुतेक भारतीय पुरुष गेमिंग अॅप्लिकेशन्स वापरण्यास प्राधान्य देतात, तर महिला फूड आणि मेसेजिंग अॅप्लिकेशन्सला प्राधान्य देतात.
Bobble AI अहवालानुसार, भारतातील युजर्सचा स्मार्टफोनवर घालवण्याचा वेळ हा 50 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, स्मार्टफोनच्या वापरामध्ये महिलांचा सहभाग सतत वाढत असतानाही, भारतातील केवळ 11.3 टक्के महिला पेमेंट अॅप्स वापरत आहेत.
पुरुषांना कोणते App आवडतात?
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय पुरुषांना सर्वात जास्त गेमिंग अॅप आवडतात. बरेच नवनवीन गेम्स आले की ते आधी खेळण्यावर भर देतात.याउलट, गेमिंग अॅप्समध्ये सर्वात कमी स्वारस्य महिलांमध्ये दिसून आले. केवळ 6.1 टक्के महिला गेमिंग ऍप्लिकेशन्स वापरत आहेत.
तुमच्या फ्रीजमधूनही आवाज येतो, मग ही धोक्याची घंटा?
महिलांना कोणतं App आवडतं?
महिला आपला सर्वात जास्त वेळ हा गेमिंग अॅप, व्हिडीओ पाहण्यात किंवा फूड रिलेटेड गोष्टी पाहण्यात घालवतात. 21 टक्के महिलांचा इंटरेस्ट हा व्हिडीओ पाहण्यात तर 23.5 टक्के महिलांचा इंटरेस्ट फूड अॅप्लिकेशनमध्ये असतो.
Pizza खाताय सावधान! किमान एकदा या लिंक क्लिकवर करून पाहा; नाहीतर पस्तावाल
पेमेंट अॅप्समध्ये महिलांचा सहभाग 11.3 टक्के आहे आणि स्पोर्ट्स अॅप्स 6.1 टक्के आहे. ग्रोसरी किंवा इतर घरातील आवश्यक सामान वापरण्याचं प्रमाण अॅपवरून मागणवण्याचं कमीच असल्याचं म्हटलं आहे. हे संशोधन मोबाईल मार्केट इंटेलिजेंस डिव्हिजनने 85 दशलक्ष अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसह गोपनीयतेच्या नियमांचे पालन केले होते. संशोधनाचे विश्लेषण बॉबल एआयने तयार केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.