मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मधील 44 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेल्या दिल्ली कॅपिटल्सला मोहम्मद शमीने लागोपाठ चार धक्के दिले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या होम ग्राउंडवर मोठा स्कोअर करून गुजरात टायटन्स समोर विजयासाठी मोठं आव्हान ठेवण्याचा दिल्लीचा मनसुबा होता. परंतु या मनसुब्याला मोहम्मद शमीने सुरंग लावला.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने डाव सुरु होताच पहिली ओव्हर टाकण्यासाठी बॉल अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीकडे दिला. यावेळी शमीने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर फिलिप सॉल्टची विकेट घेतली. त्यानंतर नो बॉवर रनआउट झालेल्या कर्णधार वॉर्नरच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रायली रासोवची देखील शमीने तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट घेतली. एकढ्यावरच न थांबता शमीने आपला धडाका सुरुच ठेवला. त्याने पाचव्या ओव्हरमध्ये आणखीन 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने प्रियम गर्ग आणि मनीष पांडे या दोघांना बाद केले.
IPL 2023 : विराटशी वाद घालणारा नवीन उल हक कोण? शाहिद आफ्रिदीसोबत ही केलेलं भांडण
पाचव्या ओव्हरपर्यंत दिल्लीचा अर्धा संघ पुन्हा पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या मोहम्मद शमीने घेतलेल्या 4 विकेट्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासह शमीच्या डोक्यावर पर्पल कॅप विराजमान झाली असून तो सध्या आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक 27 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने 9 सामन्यांमध्ये 247 रन देऊन 17 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.