मुंबई, 14 मे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घडवून आणला. हे सरकार फार काळ टिकलं नाही. मात्र या पहाटेच्या शपथविधीची आजही चर्चा होते. पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक नेत्यांनी वेगवेगळं वक्तव्य केलं आहे. आता पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार
पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच पहाटेचा शपथविधी करण्यात आला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली, म्हणून त्यांना धडा शिकवायचा होता. अजित पवारही पाहटेच्या शपथविधीसाठी तयार झाले. त्यांनी कोणतीही अट घातली नव्हती, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
जयंत पाटलांचं वक्तव्य
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दुसरीकडे शरद पवार यांनी लोक माझे सांगाती भाग दोन या आपल्या पुस्तकात पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना म्हटलं आहे की, त्याबाबत आपल्याला काहीही कल्पना नव्हती. जेव्हा पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती मिळाली तेव्हा धक्का बसला, असं पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.