गौरव सिंह, प्रतिनिधी
भोजपुर, 30 प्रतिनिधी : भोजपूरमध्ये यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी बिहारच्या राज्यपाल पोहोचले असता त्यांची गाडी चिखलात अडकल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आयोजकांसह प्रशासनाची अवस्था बिकट झाली. यावेळी डीएमपासून एसपीपर्यंत सर्वांची अवस्था विचित्र झाली होती. तर बऱ्याच प्रयत्नांनंतर राज्यपालांची गाडी बाहेर काढण्यात आली. नंतर राज्यपालांना पोलीस जिप्सीमध्ये चिखल असलेल्या जागेवरुन पुढे घेऊन जाण्यात आले.
बिहारमधील अराहमधील गधनी ब्लॉकमधील लभुवानी गावात मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. लभुआनी गावात आयोजित श्री लक्ष्मी नारायण महायज्ञ निमित्त आयोजित विशाल संत समागमाला प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेरकर आले होते.
कार्यक्रमादरम्यान वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही वेळातच कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे राज्यपालांना कार्यक्रमात बराच वेळ थांबावे लागले. पाऊस थांबल्यावर राज्यपालांचा ताफा बाहेर निघाला. मात्र, यज्ञाच्या ठिकाणी राज्यपालांची गाडी चिखलात अडकली. यावेळी भोजपूरचे डीएम आणि पोलिस अधीक्षकही उपस्थित होते. त्यांनी स्वतः चिखलात उतरून बंदोबस्त सुरू केला.
खूप प्रयत्न करूनही राज्यपालांची गाडी चिखलातून बाहेर आली नाही. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या राज्यपालांना पोलीस जिप्सीमध्ये बसवून चिखलातून बाहेर काढण्यात आले. अशा अनुचित प्रकारानंतर घटनास्थळी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. नंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलीस जिप्सीत बसवून राज्यपालांना कसेतरी कार्यक्रमस्थळापासून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. प्रदीर्घ कालावधीनंतर महामहिम घटनास्थळावरून पाटण्याकडे रवाना झाले. यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.