मुंबई, 5 मे : आयपीएल 2023 मध्ये 48 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने राजस्थानवर 9 विकेट्सने विजय मिळवला तर राजस्थान रॉयल्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची एक चूक संघाला महागात पडली.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना राजस्थान येथील स्वामी मानसिंह इंदूर स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांची जोडी फलंदाजीसाठी मैदानात आली. परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने बटलरची विकेट घेतली. संघाची धाव संख्या अवघ्या 11धावांवर असताना कर्णधार संजू सॅमसन मैदानात आला.
RUN-OUT!
A good fielding effort & a mix-up between batters! #RR lose Yashasvi Jaiswal.
Follow the match ▶️ https://t.co/tilu6n2vD3 #TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/Ntuw3LupMD
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.