नवी दिल्ली, 11 मे : IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. जयस्वालने कोलकाता नाइटराइडर्स विरुद्ध खेळत असताना अवघ्या 13 बॉल्समध्ये त्याने 50 रन्स पूर्ण केले आहे. हा आयपीएलमधला आतापर्यंत सर्वात जलद गतीने अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड आहे.
आज केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा महामुकाबला सुरू आहे. राजस्थानने पहिली बॅटिंग करत 150 रन्सचं टार्गेट दिलं आहे. 150 रन्सचा पाठलाग करत असताना यशस्वी जयस्वालने धुरळा उडवून दिला. अवघ्या 13 बॉल्समध्ये अर्धशतक ठोकलं आहे. यात 3 सिक्स आणि 5 चौकार लगावले.
(IPL 2023 : नाव मोठं लक्षण छोटं, या 7 खेळाडूंनी केलं आयपीएल टीमना कंगाल!)
याआधी सर्वाधिक जलद अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड हा केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने 2018 मध्ये पंजाब किंग्सविरोधात खेळत असताना अवघ्या 14 बॉल्समध्ये अर्धशतक केलं होतं. तर पॅट कमिंसने 2022 मध्ये कोलकाता नाइटराइडर्सकडून खेळत असताना मुंबई इंडियन्स विरोधात अवघ्या 14 बॉल्समध्ये 50 रन्स केले होते.
(TATA IPL 2023 : पहिल्या पाच आठवड्यांत JioCinemaवर 1300 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज)
यशस्वीने याआधी आयपीएलच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा पराक्रम केला होता. मुंबईकडून खेळत असताना स्थानिक पातळीवर यशस्वीच्या नावावर डब्बल सेंचुरीचा रेकॉर्ड आहे. या शिवाय, अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही त्याने सेंच्युरी ठोकली आहे. जयस्वालच्या नावावर रणजी ट्रॉफी, इरानी कप, दिलीप ट्रॉफी, विजय हजारे, इंडिया ए आणि आयपीएलमध्ये सेंच्युरी ठोकली आहे.
यशस्वी हा आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये 500 रन्स करणारा दुसरा बॅटमन ठरला आहे. या सीझन आयपीएलमध्ये सगळ्यात आधी 500 रन्सचा आकडा हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे कॅप्टन फाफ डुप्लेसीच्या नावावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.