मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात राजस्थानचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांना लोळवत आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील 1000 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानकडून सलामी फलंदाज म्हणून आलेल्या यशस्वी जयस्वालने मुंबईच्या होम ग्राउंडवर तुफान फटकेबाजी केली. यशस्वी जयस्वालने केवळ 53 चेंडूत 100 धावा करून आयपीएलमधील त्याचे पहिले शतक ठोकले. यासह त्याने आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक 423 धावा करून ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान मिळवला.
तसेच यशस्वीने आयपीएल 2023 मधील तिसरे शतक ठोकले. यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाच्या हॅरी ब्रुकने आयपीएल 2023 मधील पहिले शतक ठोकले होते. तर यानंतर केकेआरच्या व्यंकटेश अय्यरने मुंबई विरुद्ध आयपीएल 2023 मधील दुसरे शतक ठोकले होते. राजस्थान रॉयल्सने मुंबई विरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 212 धावा केल्या तर मुंबई इंडियन्सला विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.