नवी दिल्ली 25 मे : लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बर्याच व्हिडिओंमध्ये, वधूची एन्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेते. तर, काही व्हिडिओंमध्ये, वरातीतील लोक आपल्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधतात. या डान्स व्हिडिओंमध्ये लोक नागिन डान्स करण्यासोबतच जमिनीवर लोळताना तसंच अनेक अजब डान्स स्टेप्स करताना दिसतात.
प्री-वेडिंग शूटवेळी नवरीचं संतापजनक कृत्य; पोलिसांनी ठोठावला 15 हजारांचा दंड, Video Viral
सध्या लग्नातील अशाच एका डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात आपल्या लग्नाच्या आनंदात नवरदेवच जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांचंही मन जिंकलं आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवाचा जबर आणि अनोखा डान्स पाहून नेटकरीही तोंडात बोटं घालत आहेत. यात नवरदेव डीजेच्या गाण्यावर डान्स स्टेप करताना दिसत आहे.
आज कल के दूल्हा तो नचनिया सब को फेल कर दे रहा हैं नाचने में 😍🔥😂 pic.twitter.com/WcJTNZ9VTp
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) May 21, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.