मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मधील 43 व सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यानंतर मैदानावर विराट कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर या तिघांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या विराट आणि नवीन या दोघांमधील भांडणाने सामन्यानंतर रौद्र रूप घेतले. परंतु या दोघांमधील वाद नेमका कोणत्या कारणाने झाला हे सांगणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
1 मे रोजी लखनऊचे होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानावर आरसीबीचा उप कर्णधार विराट कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यात वाद झाला. तर या वादात लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने उडी घेतल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आणि गौतम गंभीर आणि विराटमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. अखेर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विराट आणि गंभीरला एकमेकांपासून दूर केल्याने हा वाद शांत झाला.
परंतु नक्की विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये कोणत्या कारणामुळे भांडण झाले याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. झालं असं की लखनऊ सुपर जाएंट्सच्या फलंदाजीवेळी 17 व्या ओव्हरमध्ये विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली. ज्यामध्ये अमित मिश्रा हस्तक्षेप केला आणि नंतर अंपायर्सने येऊन प्रकरण शांत केले. पुढच्या ओव्हरमध्ये, ब्रॉडकास्टरने पूर्ण फुटेज मोठ्या स्क्रीनवर दाखवले, जिथे कोहली काहीतरी बोलत होता आणि नवीन त्याला प्रत्युत्तर देताना दिसला. कोहली काही बोलला आणि मग नवीनकडे निशाणा करत आपला बूट दाखवला.
Virat shows his foot to Naveen Ul Haq… Sorry Indian Cricket Fans I have never seen an Indian cricketer behave so badly like him. #ViratKohli #naveenulhaq#Gambhir #RCBvLSG #AmitMishra#IPL2023 pic.twitter.com/gQNt7YsFZd
— Pambi Praveen Kumar (@PraveenPKBRS) May 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.