अनंत कुमार (गुमला), 12 मे : झारखंडच्या गुमला शहरातील जशपूर रोड राम नगर येथे अतीप्राचीन काली मंदिर आहे. दरम्यान हे मंदिर प्रसिद्ध असल्याने अनेक लोक याठिकाणी येतात. याबाबत मंदिराचे संस्थापक गंगा महाराज यांचे नातू गोपाल दुबे म्हणाले की, काली मंदिराची स्थापना 1948 मध्ये पूर्वज गंगा महाराज तिवारी यांनी केली होती. ते उत्तराखंडमधील नैनितालचे रहिवासी होते. एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर तेथुन ते गुमला येथे पळून येत स्थायिक झाल्याचे बोलले जाते. ते काली मातेचे परम भक्त असल्याने त्यांनी काली मातेच्या मंदिराची स्थापना केली.
ज्यावेळी मंदीर स्थापना करण्याचे ठरले त्यावळी स्थानिकांनी श्रमदानासह आर्थिक सहकार्य केले. दरम्यान त्याकाळापासून या मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी मातेची पूजा व आरती केली जात आहे. येथे भाविकांची मोठी गर्दी असते. पहाटे पाच ते रात्री आठपर्यंत मंदिर खुले असते.
नशीब उजळण्यासाठी या उपायांचा करा अवलंब
याचबरोबर याठिकाणी रविवारी व सोमवारी सायंकाळी महिला भाविकांकडून भजन कीर्तन केले जाते. 1970 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर परिसरात 100 वर्षांहून अधिक जुनी पींपळाची झाडे आहेत.
हे मंदिर श्रद्धा आणि भक्तीचे मोठे केंद्र बनले आहे. या मंदिराला मनोकामना पूर्ती असेही म्हणतात. आजपर्यंत काली माँच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परतले नसल्याचे मानले जाते. मनातून मागितलेली प्रत्येक इच्छा इथे पूर्ण होतात. झारखंड व्यतिरिक्त इतर राज्यातूनही लोक येथे मातेच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या वाटेने जाणारा प्रत्येक माणूस आईच्या दरबारात डोकं टेकवल्याशिवाय जात नसल्याचे सांगितले जाते.
वट सावित्री व्रत 2023 : विवाहित महिलांसाठी जुळून येत आहेत 3 दुर्मिळ योग
मंदिराचे पुजारी गोपाल दुबे म्हणाले की, काली माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते. मुलं व्हावी, लग्न व्हावे, नोकरी मिळावी, आजार दूर व्हावेत यासाठी अनेकजण प्रार्थना करतात. छत्तीसगड, बिहार, ओडिशा, झारखंड आदी ठिकाणाहून भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याचे दुबे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.