मुंबई, 24 मे : जीवन सुखमय व्हावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण आपल्या आराध्य देव-देवतेची रोज आराधना करत असतं. हिंदू धर्मात श्री गणपतीला संकटनाशक आणि बुद्धीची देवता मानलं जातं. कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यापूर्वी, शुभकार्यापूर्वी श्री गणपतीची विधिवत पूजा केली जाते. कार्यसिद्धी व्हावी, कार्यातले अडथळे दूर व्हावेत हा उद्देश यामागे असतो. दर महिन्याला संकष्टी आणि विनायक चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केली जाते. उत्तर भारतीय कालगणना आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार, श्री गणपतीच्या पूजनासाठी बुधवार हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्यास तो प्रसन्न होतो आणि जीवनातल्या अडचणी, संकटं दूर होतात असं मानलं जातं. बुधवारी श्री गणेशपूजनाचं महत्त्व नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊ या.
बुधवार हा दिवस भगवान श्री गणेशाच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. या दिवशी श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास जीवनातली विघ्नं, संकटं आणि समस्या दूर होतात. श्री गणपतीची रोज पूजा केल्यास घरातल्या वास्तुदोषामुळे समस्या निर्माण होत नाहीत. श्री गणेशपूजनामुळे घरात सुख-समृद्धी नांदते आणि पैसा, सामाजिक मान-सन्मान वाढतो असं मानलं जातं. श्री गणपतीला हळद अर्पण करणं शुभ मानलं जातं.
(आर्थिक समस्येतून सुटकेसाठी मसाल्यांचा उपाय, सुख-समृद्धीसाठी धणे आहेत फायदेशीर)
श्री गणेशाला हळद अर्पण केल्यास जीवनातलं दुःख, कष्टांचं निवारण होतं. श्री गणेशाला हळद वाहिल्यास शुभ कृपाप्राप्ती होते. प्रत्येक कामात यश मिळतं. एक हळकुंड पिवळ्या कापडात बांधून श्री गणपतीला अर्पण केल्यास जीवनात सकारात्मक परिणाम दिसू लागतात. घरातली नकारात्मकता दूर होते. त्यामुळे श्री गणेशाच्या पूजेवेळी हळदीचा वापर शुभ मानला जातो, ‘डेली न्यूज 360 डॉट पत्रिका डॉट कॉम`ने याविषयी माहिती दिली आहे.
बुधवारी श्री गणपती पूजा केल्याने वास्तुदोष नाहीसा होतो. श्री गणेशाची विधिवत पूजा आणि हळदीचे हे उपाय केल्यास श्री गणेशाची कृपादृष्टी प्राप्त होते, असं मानलं जातं. श्री गणपतीला आद्यपूजेचा मान आहे. प्रत्येक शुभकार्यापूर्वी श्री गणपतीचं पूजन केलं जातं. यामुळे कार्यसिद्धी होते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते. श्री गणपतीची मूर्ती किंवा फोटो घराच्या मुख्य दरवाज्यावर लावला तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत, असं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी, जीवनात सुख-शांती लाभावी यासाठी बुधवारी श्री गणेशपूजन करणं आणि पूजनावेळी हळदीचा वापर करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.