सौरभ वर्मा (रायबरेली) 16 मे : उत्तर प्रदेशच्या रायबरेलीपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर लखनौ-अलाहाबाद महामार्गावर लालूपूर गावातील अस्तिक बाबा मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला विषारी साप चावला असेल तर तो या मंदिरात आल्यास त्याचा जीव वाचू शकतो. याबाबत लोकांची श्रद्धा असल्याचे बोलले जात आहे. साप चाललेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या उपचारांची गरज नाही. तसेच अस्तिक बाबाचे नुसते नाव घेतल्याने तुम्हाला सापांची भीती वाटणार नाही अशीही अख्यायीका बोलली जाते. हे मंदिर महाभारत काळातील असल्याचे चर्चा आहे.
श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरली जाते. यामध्ये रायबरेली जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातील भाविकही दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिराचे पुजारी अमित तिवारी म्हणाले की, नागपंचमीच्या एक दिवस आधी लाखो भाविक येथे येतात. या मंदिराशी पांडवांचाही संबंध असल्याचे पूर्वज सांगत होते.
अयोध्येतून मोठी बातमी, राम मंदिराचं छत तयार, खास दगड वापरला, स्पेशल PHOTOS
पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा राजा परीक्षित जंगलात शिकार करायला गेला होता तिथे त्याने एका हरणाची शिकार केली यामध्ये एक हरिण जखमी झाले. पण ते जखमी हरिण त्याच्या नजरेतून नाहीसे झाले, तेव्हा राजाने आजूबाजूला पाहिले आणि जवळच एक ऋषी बसलेला दिसला.
राजा परीक्षित यांना ऋषीकडून याबाबत माहिती मिळवायची होती तेव्हा त्यांनी काहीही सांगितले नाही. यामुळे राजाला राग आला आणि त्याने त्याच्या गळ्यात मृत साप बांधला. तेथे उपस्थित असलेल्या ऋषीपुत्र शृंगीने हे पाहिले तेव्हा त्याने राजाला शाप दिला की आठवडाभरात सर्वात विषारी साप तुला दंश करेल. राजा परीक्षिताचा पुत्र जनमेजया याला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने सापांचा नाश करण्यासाठी मोठा यज्ञ केला. तेव्हा अस्तिक महाराजांनी यज्ञ थांबवून सापांना वाचवलं. तेव्हापासून अस्तिक महाराजांचे नाव घेतल्याने लोक सापांना घाबरत नाहीत, असा समज आहे.
कडकत्या उन्हात थंडावा देईल कोकोनट मॅंगो क्रीमची अफलातून चव
मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त शिवप्रसाद यांनी सांगितले की, श्रावण महिन्याच्या शेवटच्या महिन्यात माझ्या पत्नीला साप चावला होता. मी तिला इथे आणले यातून ती बरी झाली. मला कुठेही कोणत्याही प्रकारच्या उपचारांची गरज लागली नाही. तेव्हा मी इथे पत्नी आणि कुटुंबासह येऊन पूजा केली असल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.