मो. सरफराज आलम, प्रतिनिधी
बिहार, 08 मे : कुठल्याही अडचणीवर तोडगा काढण्यात आपल्याकडे लोकांची कमी नाही. कुठल्याही गोष्टीवर काय उपाय काढतील याचा नेम नाही. बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सौरबाजार परिसरातील बैजनाथपुर वार्ड-5 येथील एका शेतकऱ्याने अवघ्या 3 हजार रुपयांमध्ये शेतात नांगरणी करण्यासाठी यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या आयडियाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
दिनेश कुमार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. दिनेश कुमार यांच्याकडे थोडीफार शेती आहे. यात 7 गुंठे एवढी जागा असलेल्या 2 जागा आहे. नेहमी नांगरणी करण्यासाठी ते ट्रॅक्टर चालकाकडे जात होते. पण शेती ही छोटी असल्यामुळे आणि अंतर दूर असल्यामुळे ट्रॅक्टर चालक नकार देत होते.
त्यामुळे दिनेश यांनी यावर उपाय शोधून काढला. घरात वडिलांनी खरेदी केलं नांगरणीचं साहित्य होतं. हे साहित्य पाहून त्यांना एक कल्पना सुचली. बाजारात जाऊन त्यांनी 1500 रुपयांची एक सायकल विकत घेतली. सायकलीचे पुढेचे चाक, हँडल आणि इतर वस्तू खरेदी केल्यात. त्यानंतर वेल्डिंग काम करणाऱ्याकडे जाऊन नांगर या सायकलला जोडला. मग, काय सायकल घेऊन दिनेश शेतात आले आणि त्यांनी नांगरणी करून पाहिली तर काम यशस्वी झालं.
दिनेश यांचा प्रयोग पाहून छोटी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. मुळात छोटी शेती असल्यामुळे ट्रॅक्टर चालक नांगरणी करण्यासाठी येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे त्रस्त झाले होते. दिनेश यांनी अवघ्या 3 हजारांमध्ये नांगरणीचे यंत्र तयार के ल्यामुळे इतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता दिनेश हे आपल्या शेतात याच सायकलीच्या मदतीने नांगरणी करत आहे. सायकल असल्यामुळे थोडी ताकद आणि वेळ लागतो. पण काम पूर्ण होत आहे, याचं समाधान दिनेश यांना आहे. ज्यांच्याकडे 4 ते 5 गुंठे शेती आहे, ती दिवसभरात सहज या सायकलीमुळे नांगरणी केली जात आहे. शेजारी राहणाऱ्या इतर शेतकऱ्यांनीही दिनेश यांनी तयार केलेल्या यंत्राप्रमाणेच सायकल घेऊन नांगरणीसाठी यंत्र तयार करत आहे. भात बियाणे पेरण्यासाठी किंवा भाजीपाला लागवड करण्याचे काम यामुळे सोपे झाले आहे. दिनेश यांच्या या आयडियाबद्दल परिसरातील नागरिक कौतुक करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.