मुंबई, 24 एप्रिल : सांधे, घोटे, गुडघे दुखणे, बोटांना सूज येणे हे युरिक अॅसिडचे लक्षण आहे. यूरिक अॅसिडची समस्या खराब आहारामुळे उद्भवते. यूरिक अॅसिडची पातळी वढल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ते हाडांमध्ये जमा होते आणि हळूहळू गॅप तयार होऊ लागतो. असे झाल्यास धावणे, पळणे सोडाच चालणं देखील अवघड होते. एवढंच नाही तर हाडांमध्ये यूरिक अॅसिड जमा झाल्यानं सांधेदुखीसह स्नायूंमध्ये तणाव आणि क्रॅम्पची समस्या उद्भवते.
प्यूरीनयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरात त्याचे प्रमाण वाढते. किडनी ते काढू शकत नसेल तर ते यूरिक अॅसिडमध्ये रुपांतरित होते आणि रक्तात मिसळते. यानंतर सांधे दुखणे आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की दोन भाज्यांचा ज्यूस यावर अतिशय प्रभावी आहे. कन्नौजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहारतज्ञ आणि डायबिटीज एजुकेटर रोहित यादव यांच्याकडून या रसाविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
उन्हाळ्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त गरम का होते? तज्ज्ञांनी सांगितले याचे कारण
या अवयवांवर होतो परिणाम
खराब जीवनशैलीमुळे शरीरात यूरिक अॅसिड तयार होऊ लागते. त्याची सततची वाढ आरोग्यासाठी हानिकारक असते. शरीरातील किडनी, यकृत, हृदय आणि सांध्यांवर याचा अधिक परिणाम होतो. त्यामुळे या सर्वांच्या कामावर मोठा परिणाम होतो. रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे किडनी स्टोन, संधिवात आणि गाउट यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
या गोष्टींचे सेवन टाळा
तुमच्यामध्ये युरिक अॅसिड वाढले असेल तर टेंशन घेण्याऐवजी तुमच्या आहारात बदल करा. असे केल्याने यूरिक अॅसिडचे नियंत्रण कमी होऊ लागते. यासाठी सर्वप्रथम, अल्कोहोल, रेड मांस, केळी, ब्रोकोली, मासे आणि बिअर यांसारख्या प्युरीन समृद्ध असलेल्या गोष्टींचा त्याग करावा. यांचे सेवन केल्याने समस्या आणखी वाढतात. तसेच आहारात व्हिटॅमिन सी आणि जास्तीत जास्त पाणी असलेली फळांचा समावेश कारा. त्यामुळे यूरिक अॅसिड नियंत्रणात येईल.
या भाज्यांचे रस फायदेशीर
काकडीचा रस : काकडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याचा रस पिणे देखील आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. काकडीच्या रसात लिंबाचा रस घालून प्यायल्यास यकृत आणि किडनी डिटॉक्स करण्यास मदत होते. काकडीत असलेल्या पोटॅशियम आणि फॉस्फरसमुळे रक्तातील यूरिक अॅसिडची पातळी कमी होते. त्यामुळे किडनी फिल्टरची शक्ती देखील वाढते. यामुळे लघवीद्वारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
Diabetes Tips : डायबिटीजच्या लोकांनी उन्हाळ्यात नारळ पाणी प्यावं का, काय होतात परिणाम?
गाजराचा रस : तुम्ही हाडांमधील वाढत्या यूरिक अॅसिडमुळे त्रस्त असाल तर गाजराचा रस पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी ताज्या गाजराच्या रसात लिंबाचा रस घालून प्या. गाजरात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, बीटा कॅरोटीन, मिनरल्स आणि व्हिटॅमिन ए आढळतात. यामुळे यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत होते आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.