मुंबई, 27 एप्रिल-आई कुठे काय करते मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेत एक पात्र असं आहे की, सतत त्याचा तिरस्कार केला जातो. पण मालिकेत अनिरुद्धचा जितका तिरस्कार केला जातो तितकचं त्याला बाहेरच्या जगात प्रेम मिळत आहे हेही तितकच खरं आहे. मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसतात. अनिरुद्धची भूमिका नकारात्मक आहे पण मिलिंद यांनी अभिनय कौशल्याच्या जीवावर ती लोकांच्यात लोकप्रिय केलेली आहे.
मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. शिवाय आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरील देखील काही किस्से शेअर करताना दिसतात. मालिकेत मिलिंद गवळी आजोबा झाले आहेत. आई कुठे काय करते मालिकेत देखील त्यांची सुनबाई अनघा आणि मुलाचं एक लहान बाळ आहे. या बाळालं घेऊन मालिकेचं शुटिंग कसं करतात असा प्रश्न सगळ्यांना पडते. आता मिलिंद गवळी यांनी यासंबंधीच एक पोस्ट केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
वाचा-‘अजूनही बरसात आहे’ मालिकेचा लवकरच येणार पार्ट 2 ? अभिनेत्याने दिली मोठी हिंट
मिलिंद गवळी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, शूटिंग मध्ये सगळ्यात कठीण काम का असेल तर लहान बाळांबरोबर ,लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणं सगळ्यात कठीण असतं ,खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घ्यायचं असतं हे त्यांना माहितीच नसतं,माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला, माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमांमध्ये काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.