मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 10 एप्रिल रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडलेला सामना यंदाच्या आयपीएल सिजनमधील सर्वात चर्चेत राहिला. या रोमांचक सामन्यात लखनऊच्या टीमने आरसीबीला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभवाची धूळ चारली. या सामन्यात गोलंदाज अमित मिश्राकडून एक मोठी चूक झाली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहली, मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर लखनऊ समोर विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबीसाठी 44 चेंडूत 61 धावा केल्या. परंतु अखेर विराट कोहलीचा झंझावात थांबवण्यात लखनऊचा गोलंदाज अमित मिश्राला यश आले. परंतु यादरम्यान अमितच्या हातून एक चूक घडली.
अमित मिश्रा जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा तो बॉलवर थुंकी लावत असताना कॅमेऱ्यात कैद झाला. असे करून त्याने कोविड-19 शी संबंधित एक महत्त्वाचा नियम मोडला आहे. यावेळी अंपायरने अमितला इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. 12 व्या ओव्हर दरम्यान हा सर्व प्रकार घडला. बॉलला थुंकी लावल्यामुळे
बॉलला अतिरिक्त टर्न मिळण्यास मदत होते आणि याचा फायदा देखील विराटची विकेट घेताना अमित मिश्राला झाला. यानंतर चाहते सोशल मीडियावर अमित मिश्राने जे केले ते योग्य होते का असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
Is saliva allowed in ipl?? #iplinhindi #IPL2023 #ipl #rcb #JioCinema pic.twitter.com/Uh7hiR7D2G
— ROHIT RAJ (@RohitRajSinhaa) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.