धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 29 एप्रिल : मुंबईकरांना रविवार म्हंटलं की रेल्वे प्रवासाचं मोठं टेन्शन असतं. प्रत्येक रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जातो. अभियांत्रिकी कामासाठी घेतल्या जाणाऱ्या या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक बदललेलं असतं. मेगा ब्लॉकच्या काळात अनेक गाड्या रद्द असतात. येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी अभियांत्रिकी कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे तर पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते सांताक्रुझ दरम्यान ब्लॉक असेल.
मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 दरम्यान ब्लॉक असणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुटणाऱ्या फास्ट लोकल्स या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर ठाण्याच्या पुढे या फास्ट लोकल डाऊन फास्ट मार्गावर चालवल्या जातील. ठाण्यातून सुटणाऱ्या फास्ट मार्गावरील लोकल या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर चालवल्या जातील. माटुंग्यानंतर त्या पुन्हा फास्ट मार्गावर धावतील. या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकांवरच थांबतील.
तुमच्या शहरातून (मुंबई)
हार्बर मार्गावर देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेल साठी डाऊन मार्गावर आणि वांद्रे/ गोरेगाव येथून सुटणार्या सीएसएमटी स्टेशन साठी डाऊन हार्बर मार्गावर सेवा बंद राहणार आहे. ब्लॉकच्या काळात पनवेल- कुर्ला दरम्यान मात्र 20 मिनिटांनी एक लोकल फेरी चालवली जाणार आहे.
1 रुपयामध्ये मिळणार नोकरी, मुंबईच्या तरुणाने तयार केलं खास APP
पश्चिम रेल्वे मार्गावर देखील सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत ब्लॉक असणार आहे. सांताक्रुझ – जोगेश्वरी दरम्यानच्या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस आणि काही लोकल फेर्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.