मुंबई, 1 एप्रिल : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात पारपडला असून पहिल्या सामन्यात गुजरातने धोनीच्या चेन्नईचा पराभव केला. यासामन्यापूर्वी झालेल्या आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रश्मिका मंधाना हिने आपल्या डान्सचा तडका लावला. यावेळी रश्मिकाच्या डान्सची भुरळ भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांना देखील पडली.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना पारपडला. या सामन्यापूर्वी तब्बल 4 वर्षांनी आयपीएल चा दिमाखदार उदघाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात प्रसिद्ध गायक अरिजित सिंह, अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंधाना यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. अरिजित सिंह याने बॉलिवूडमधील अनेक गाणी गायली. तर तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंधाना या दोघांनी बॉलिवूड आणि साऊथच्या गाण्यावर डान्स केला.
IPL 2023 : IPL च्या दिमाखदार सोहळ्यातील रश्मिका आणि तमन्नाचे न पाहिलेले हे खास Videos
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.