नवी दिल्ली 28 एप्रिल : जगात लाखो जीव आढळतात. त्यातील काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना पाहून माणूस भीतीने थरथर कापू लागतो. यापैकी एक प्राणी म्हणजे साप. या रांगणाऱ्या प्राण्याच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी मानली जाते. वाटेत एखादा कोब्रा साप दिसला, तरी कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे.
कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र तरीही काही लोक न घाबरता या सापाला अगदी सहज पकडतात किंवा त्याच्यासोबत खेळताना दिसतात. एका व्यक्तीने असंच काहीसं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लगेचच आपल्या कर्माचं फळ मिळालं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
Don’t bring a gun to a cobra fight! 🐍 pic.twitter.com/qGshAWdjHu
— Instant Karma (@Instantregretss) December 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.