मुंबई 13 एप्रिल : एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणं सहजासहजी शक्य नसतं. यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात अनेक आव्हानं येत असतात, त्याला खूप संघर्ष करावा लागतो. तरुण लेखक मुकुल कुंद्रा यांचा प्रवाससुद्धा असाच संघर्षमय आहे. रस्त्यावर पुस्तकं विकण्यापासून सुरू झालेला कुंद्रा यांचा प्रवास आता एक लेखक म्हणून थेट दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात स्वतःच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यापर्यंत पोहोचला आहे. याबाबतचा व्हिडिओ कुंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. ‘यश हे अपघात नाही. ते कठोर परिश्रम, चिकाटी, जिद्द, अभ्यास, त्याग आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे करत आहात किंवा शिकत आहात त्याबद्दल असणार प्रेम आहे.’ जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेलेच्या या शब्दांचं उत्तम उदाहरण म्हणजे इन्स्टाग्रामवर लेखक मुकुल कुंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये त्यांना एक लेखक म्हणून कसा संघर्ष करावा लागला, याची एक झलक दाखवण्यात आलीय.
कमी वयात नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हा’ कोर्स, पाहा कशी आहे प्रवेश प्रक्रिया Video
कुंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ते रस्त्यावर पुस्तक विकताना दिसतात. तर, या व्हिडिओचा शेवट हा दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात त्यांना एक लेखक म्हणून ज्या सन्मानानं वागणूक मिळते, ते दाखवताना होतोय. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘एक दिवस मी ते मिळवेनच. हा प्रवास आजपर्यंतचा रोलर कोस्टर आहे, आणि ही फक्त एक सुरुवात आहे. ‘कीप हसलिंग..यू विल मेक इट’ या माझ्या मंत्रावर मी कायम आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.