मुंबई, 16 मे : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप करत आहेत, त्यांच्या अधिकारांवर राऊतांकडून शंका घेतली जात आहे, त्यामुळे अध्यक्षांची पर्यायाने विधिमंडळाची प्रतिमा खराब करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
सजंय शिरसाट यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करावा अशी मागणी केली आहे. संजय राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षांविरोधात बेताल आरोप करत आहेत. त्यांच्या अधिकारांवर शंका घेत आहेत. एवढचं नाही तर मुख्यमंत्र्यांबाबतही वादग्रस्त वक्तव्य करत आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात यावा अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राऊतांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल
दरम्यान संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सरकार घटनाबाह्य असून, त्यांचे आदेश पाळू नका असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.