जयपूर, 8 मे : आयपीएल 2023 मध्ये सनरायजर्स हैदराबादने राजस्थानचा शेवटच्या बॉलवर रोमांचक पराभव केला. शेवटच्या दोन ओव्हर शिल्लक असताना राजस्थान हा सामना जिंकेल असं वाटत होतं, पण हैदराबादने 19 व्या ओव्हरला 24 आणि 20व्या ओव्हरला 19 रन काढून राजस्थानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून आणला. संदीप शर्माने शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला टाकलेला नो बॉल मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला असला तरी जॉस बटलरची खेळीच राजस्थानसाठी घातक ठरली, असं म्हणावं लागेल.
जॉस बटलरने 59 बॉलमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 95 रन केले. तर संजू सॅमसनने 38 बॉल 66 आणि यशस्वी जयस्वालने 18 बॉल 35 रनची खेळी केली. या तिघांच्या बॅटिंगच्या जोरावर राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 215 रनचं आव्हान दिलं. या सामन्यात बटलरने 161 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. बटलर राजस्थानचा सर्वाधिक रन करणारा खेळाडूही ठरला, पण त्याच्या खेळीमुळेच राजस्थानला पराभवाचा धक्का बसला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एक नो बॉलने खेळ खल्लास, धोनीला रोखणाऱ्या संदीपची चूक राजस्थानला महागात
बटलरची संथ खेळी
स्कोअरकार्डवर नजर टाकली तर बटलरने 161 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली हे दिसत असलं तरी पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये बटलर संथ खेळला. पहिल्या 6 ओव्हरचा पॉवर प्ले संपला तेव्हा बटलर 13 बॉलमध्ये 14 रनवर म्हणजेच 100 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने खेळत होता.
17 व्या ओव्हरमध्ये बटलर 54 बॉल 92 खेळत होता. 18वी ओव्हर संपली तेव्हा बटलरचा स्कोअर 57 बॉल 94 होता. यानंतर 19व्या ओव्हरला बटलर 59 बॉल 95 रन करून आऊट झाला, म्हणजेच डेथ ओव्हरच्या 6 बॉलमध्ये बटलरने फक्त 3 रन केले. शतक करण्यासाठी बटलरने त्याच्या बॅटिंगचा वेग कमी केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॉवर प्लेमध्ये 100 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग आणि डेथ ओव्हरमध्ये कमी झालेल्या स्ट्राईक रेटमुळे 94 रन करूनही बटलर राजस्थानच्या पराभवाचा व्हिलन ठरला.
या सामन्यात राजस्थानने फक्त 2 विकेट गमावल्या आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असलेल्या शिमरन हेटमायरला फक्त 5 बॉल खेळण्याची संधी मिळाली. तसंच जो रूट आणि ध्रुव जुरेल यांना बॅटिंगची संधीही मिळाली नाही.
IPL 2023 : रविवारच्या डबल हेडरने पॉईंट्स टेबल फिरलं, प्ले-ऑफची रेस आणखी थरारक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.